आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्णकर्कश आवाज करणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या बुलेट शहर वाहतूक पोलिसांनी जप्त केल्या. या जप्त केलेल्या वाहनांचे मॉडिफाइड सायलेंसर काढून शहर वाहतूक शाखेत पोलिसांनी रोडरोलर आणून त्याखाली नष्ट केले. ही कारवाई शुक्रवारी केली.
शहरातील सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात बदल करणाऱ्या मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबवून रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेल्या वाहनांचा शोध घेवून बुलेट वाहनांवर कायदेशीर कारवाई केली. या वर्षात आजपर्यंत १२६० वाहनावर कायदेशीर कारवाई करून एक लाख ९० हजार रुपये दंड वसूल केला.
पोलिसांनी जप्त केलेले सायलेन्सर हे सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडून सायलेन्सर नष्ट करण्याची लेखी परवानगी घेऊन अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे रोडरोलरद्वारे नष्ट केले. या कारवाईत २०० फटाके फोडणारे सायलेन्सर नष्ट करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारे मोहीम राबवण्यात येणार आहे, त्यामुळे कर्कश आवाज कारणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांना सतर्क राहण्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.