आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला गुरुवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.हरिदास सहदेव डोंगरे (वय ६१ रा. इंदिरा नगर, वाडेगाव, ता. बाळापूर) असे आरोपीचे नाव आहे. २१ ऑगस्ट २०२० रोजी पीडिता ही तिच्या घरात असताना सायंकाळी पाऊस येत होता, तेव्हा हरिदास तिच्या घरात आला व त्याने तिला बसण्यासाठी खुर्ची मागत तिचा विनयभंग केला. सायंकाळी पीडितेने हकीकत घरच्यांना सांगितली व बाळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून पोलिसांनी हरिदासविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने हरिदास डोंगरेला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कारावास सुनावला. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे व शीतल डी. भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी एलपीसी रेखा पाटील व एलपीसी सोनू आडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.