आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांना पत्र:सोमवारी सुटी द्यावी ; खासगी शिक्षक संघटनेचे आयुक्तांना पत्र

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक कर्मचारी रविवारी कार्यरत हाेते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना साेमवारी सुटी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे यांनी राज्य निवडणूक आयाेगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध शासकीय िवभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती.

रविवारी झालेली मतदान प्रक्रिया सुरळीतणे पार पडावी, यासाठी कर्मचारी शनिवारी दुपारीच नियुक्ती करण्यात आलेल्या मतदान केंद्राकडे तालुक्यातून निघाले हाेते. रविवारी सायंकाळी मतदान पूर्ण झाले तरी ही अन्य बाबींची पूतर्ता रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी १९ डिसेंबरची रजा मंजूर करण्याची मागणी राज्य खासगी शिक्षक संघटनेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...