आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात पुढच्या 3 दिवसांत पावसाची शक्यता:पुढील पाच दिवस मान्सून सक्रीय; पेरण्यांना वेग, जिह्यात आतापर्यंत 13.7 मिलीमीटर पाऊस

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवारी, 20 जूनला दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सायंकाळी विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

विविध तालुक्यांमध्ये 14 जून पासून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होत आहे. 16 जून रोजी सर्वाधिक 40.7 मिलीमीटर त्यानंतर 19 जूनला 13.7 मिलीमीटर हे दोन समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक भागात जमिनीची ओल तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे हाती घेतली आहेत. दरम्यान विदर्भात पुढील तीन दिवस मुसळदार पावसाची शक्यता आहे. पाच दिवस मान्सून सक्रिय राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्यास हरकत नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.

मान्सून सक्रिय

हवेच्या मध्यम थरात सक्रिय असलेला पश्चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रावरुन वायव्य भारतात येणारे सशक्त मोसमी वारे यांच्या प्रभावामुळे मध्यप्रदेश आणि विदर्भात पुढील पाच दिवस मान्सुन सक्रिय राहण्याची शक्यता प्रा. अनिल बंड यांनी सांगतिले आहे.

तीन दिवस मुसळधार पाऊस

20, 23 आणि 24 जून हे तीन दिवस विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 व 21 जूनला सर्व जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

असा राहणार पाऊस

22 जून : पूर्व विदर्भात सार्वत्रिक पाऊस. उर्वरित विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम.

23 जून : सर्वच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, एक-दोन ठिकाणी मुसळधार.

24 जून : विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता 50 %. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.

बातम्या आणखी आहेत...