आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:रब्बी हंगामात 10 हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेने या वेळी रब्बीच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे त्यामुळे रब्बी, उन्हाळी पीक पद्धतीत बदल दिसून येईल.हरभरा, गहू, कांदा या पिकासोबत यंदा सोयाबीन, मूगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

अकोला पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारीत जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा हे तीन मध्यम प्रकल्प तर २४ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातून विविध पाणी पुरवठा योजना तसेच सिंचन तर लघु प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी दिले जाते. जिल्ह्यातील प्रकल्पामुळे ३४७.०१ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तूर्तास ३३२.८२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध पाण्यातून होणारे बाष्पीभवन तसेच इतर व्यय आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव पाणी वजा करुन उपलब्ध पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार आहे.

एक दलघमीतून १५० हेक्टर सिंचन : साधारणपणे एक दशलक्षघनमीटर पाण्यातून १५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. कोणते पिक घेतले, यावरही पाण्याची कमी-अधिक गरज भासते. यानुसार उपलब्ध पाण्यातून जमिनीचे सिंचन निश्चित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...