आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरित क्षेत्र विकास प्रकल्पा अंतर्गत शहराच्या विविध २० ठिकाणी असलेल्या ग्रीन स्पेसच्या मेन्टनन्सचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे २१ हजार ८०१ पेक्षा अधिक झाडांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे हे काम महापालिका कर्मचाऱ्यांनीच केले.
काँक्रिटीकरण, रस्ते रुंदीकरण, कमी झालेले वनक्षेत्र यामुळे तापमानात वाढ झाली आहे. तर पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. शहरी भागाला याचा अधिक फटका बसला आहे. ही बाब लक्षात घेवूनच शहरी भागात ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, प्रदूषणाला आळा बसावा, लुप्त होत चाललेली पक्षी वाचवावे, या हेतून अमृत योजने अंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबवण्यात आला. शहरात हा प्रकल्प राबवण्यासाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून शहराच्या विविध भागात एकूण २० बाग (ग्रीन स्पेस) तयार करण्यात आल्या आहेत. यात विविध प्रकारचे वृक्ष तसेच फुलझाडे देखिल लावण्यात आले आहेत.
यात केवडा, मोगरा, जास्वंद, तगरी, कण्हेर, मधुमालती, मदनमस्त, चाफा, सोनचाफा आदी फुलझाडांचा समावेश आहे. ग्रीन स्पेस निर्मितीचे कंत्राट देण्यात आले होते. वृक्ष लागवडीनंतर तीन वर्ष या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती. २० बागांमध्ये वृक्ष लागवड करुन तीन वर्षाचा कालावधी होवून गेल्यानंतर बागांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. मात्र उशिराने का होईना महापालिकेने आता मेन्टनन्सचे काम सुरू केले आणि आता ते पूर्ण झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.