आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले:प्रकल्पात 85 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध; नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे चार दरवाजे 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता उघडण्यात आले. 30 सेंटीमीटरने वर करण्यात आलेल्या या दरवाज्यातून 92.23 घनमिटर प्रतिसेंकद (92 हजार 230 लिटर प्रतिसेंकद) विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

84 टक्के जलसाठा उपलब्ध

काटेपूर्णा प्रकल्पाच्या मंजुर जलाशय परिचालन सुची नुसार 31 ऑगस्टपर्यंत 80 टक्के जलसाठा ठेवावा लागतो. काटेपूर्णा प्रकल्पाचे 31 जुलै रोजी प्रकल्पात 84 टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने सकाळी दहा वाजता दोन दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. यातून 46.11 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विसर्ग बंद करण्यात आला. तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रकल्पात 85 टक्के जलसाठा ठेवावा लागतो. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने सांयकाळी 6.30 वाजता प्रकल्पात 84.91 टक्के जलसाठा उपलब्ध झाला. तसेच पाण्याची आवक सुरू राहिल्याने सायंकाळी सात वाजता प्रकल्पाचे चार दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले. यातून ताशी 33 कोटी 20 लाख 28 हजार लिटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रशासनाने काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

यासह अनेक गावांना दिला इशारा

महान, चिंचखेड, निंभारा, तामसी, दोनद खुर्द, दोनद बु, राहित, साहित, खांबोरा या गावांसह अनेक गावांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...