आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १५८ टक्के पाऊस बाळापूर तालुक्यात झाला आहे. त्यानंतर अकोला, तेल्हारा या तालुक्यांचा क्रमांक लागतो. आतापर्यंत सर्वात कमी ७७.३ टक्के पाऊस हा अकोट तालुक्यात झाला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने समाधानकारक स्थिती आहे. तर काही ठिकाणी अधिक पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीही अधिच स्थिती होती. त्यामुळे नदी आणि नाला काठच्या शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या महिन्यात सरासरी ६९३.७ मिमी. पाऊस होतो. त्यापैकी ३७९.६ म्हणजे सरासरी ११२.१ टक्का पाऊस झाला आहे. असे असले तरी गेल्या वर्षी २८ जुलैपर्यंत ३८५.४ मिमी. म्हणजे ११३.९ टक्के पाऊस होता. म्हणजे जेमतेम परिस्थिती सारखीच होती.

तालुकानिहाय पाऊस
तालुका - मिमी. - टक्केवारी
अकोट - २५२.३ (७७.३)
बार्शीटाकळी - ३४२.६ (९८.५)
मूर्तिजापूर - ३५०.५ (१००.३)
पातूर - ४०१.२ (१००.७)
तेल्हारा - ३६८.० (११६.६)
अकोला - ४४५.७ (१३३.२)
बाळापूर - ४७२.२ (१५८.१)
जिल्हा - ३७९.६ (११२.१)

बातम्या आणखी आहेत...