आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी:मोरगाव सादिजनच्या जि. प. शाळेत इको-फ्रेंडली होळी; कब बुलबुल व मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत उपक्रम

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल्यवर्धन कार्यक्रम, स्काऊट गाइड व कब बुलबुल उपक्रमांतर्गत बाळापूर पंचायत समितीमधील मोरगाव सादिजन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फुलांची व नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरण पूरक अर्थातच इको-फ्रेंडली होळी उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन व पाणी बचत करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प करतानाच इको-फ्रेंडली होळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.

आदिवासी बांधव निसर्गाची हानी न करता होळी साजरी करतात. त्यांच्या होळीला आठशे वर्षांचा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पर्यावरणपूरक होळीचे आयोजन शालेयस्तरावर करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट सवयी, वाईट विचार व अवगुण कागदावर लिहून त्यांची प्रतिकात्मक होळी केली. याप्रसंगी सर्वांनी ढोलाच्या तालावर गोल रिंगणात नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर निकाडे यांनी केले, सूत्रसंचालन युनिट लीडर श्रीकृष्ण डांबलकर यांनी केले तर आभार वर्षा गोपनारायण यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील प्रमोद बगले, सुषमा मेहेकरे, स्मिता देवकर, लीना देशमुख, मनीषा सर्वज्ञ, बाळा निकाडे व स्काऊट गाईड कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...