आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुट्या सुरू झाल्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी असताना एसटीमध्ये तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ६० टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन (इटीआयएम) बंद आहेत. त्यामुळे जुन्या काळातील ट्रे मशिन मधून पंच करुन देण्यात येणारे तिकीट पुन्हा प्रवाशांना देण्यात येत आहे.
जग डिजिटलायझेशन कडे जात असताना एसटी महामंडळाचा उलटा प्रवास सुरू आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर तसेच प्रवाशांच्या सेवेवर होत आहे.
कामगारांचा संप मिटल्यामे एसटी आता पूर्वीच्या वेगाने धावण्याची अपेक्षा असताना सध्या अडथळ्यांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात वापरात असलेल्या ९०८ मशीनपैकी ६१० मशीन बंद आहेत. त्यातही हल्ली तिकीट छपाई बंद करण्यात आल्याने साध्या तिकिटांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कागदाचे दर वाढल्याने काही काळ छपाई थांबवण्यात आली आहे.
मात्र, महामंडळाकडे मुबलक प्रमाणात तिकीटे उपलब्ध आहेत, असा दावा करण्यात आला आहे. अकोला विभागातील एकूण नऊ आगारांमूधन मुंबई सर्व्हिस सेंटरला १८८ मशीन पाठवण्यात आल्या आहेत, तर ३६१ मशीन अकोला सर्व्हिस सेंटर व आगारामध्ये पडून आहेत. काही मशीन गहाळही झाल्या आहेत. त्यामुळे सध्या कामामध्ये फक्त ३५१ मशीन आहेत. यातीलही अनेक मशीनमध्ये बऱ्याच समस्या आहे. अकोला विभागात सध्या ५५७ मशीनचा तुटवडा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.