आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:माउंट कारमेल स्कूलचा निकाल 100 टक्के ; स्कुलमधून इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक ऋषी अग्रवाल

बोरगाव मंजू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने माध्यमिक इयत्ता दहावीचा निकाल घोषित केला. या परिक्षेत बोरगावमंजुतील माउंट कारमेल स्कूलने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

माउंट कारमेल स्कुलमधून इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक ऋषी अग्रवाल ९४ टक्के, द्वितीय क्रमांक अस्मिता संतोष चक्रनारायण ९३.६० टक्के, तर तृतीय क्रमांक कृष्णा पांडव ह्या विद्यार्थ्यांने ९३.४० टक्के घेऊन यश संपादन केले. दरम्यान अस्मिता संतोष चक्रनारायण हीने माउंट कारमेल स्कुलमध्ये यंदा मुलीमधून सर्वाधिक ९३.६० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. स्कुलच्या सर्व विध्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई-वडीलसह, माउंट कारमेल स्कुलचे मुख्याध्यापक फादर जॉर्ज, तसेच शिक्षकांना दिले. दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर जॉर्ज यांनी कौतूक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...