आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकोट तालूक्यातील डांगरखेडा या आदीवासी गावातील पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिण भावाचा धरणात बुडून करून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. 12) दूपारी घडली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डांगरखेड येथील आदीवासी केशवराव बेलसरे हे आपल्या शेताची कामे पूर्ण करुन रविवारी बाजारपेठत बी- बियाणे खरेदीसाठी आकोट येथे गेले होते. त्यांच्यामागे त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा युवराज आणि अकरा वर्षीय मुलगी प्रतिक्षा हे दोघे भावंडं शेजारच्या मुलीसोबत धरणावर पोहायला गेले. युवराज पाण्यात उतरला. त्याची बहिण प्रतिक्षा व तिची मैत्रिण पाण्याबाहेर होत्या. पोहताना युवराज बुडत असल्याचे प्रतिक्षाने पाहिले असता भावाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली. परंतु दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते.
हा प्रकार पाहून प्रतिक्षाची मैत्रिण भेदरली लोकांची मदत मिळावी म्हणून तिने गावाकडे धाव घेत घडत असलेला प्रकार कळविला. परंतु लोकांना येण्यास उशीर झाला आणि या चिमुकल्या बहिणभावाचा पाण्यात बुडून अंत झाला.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोपटखेड येथील पांडूरंग तायडे यांचे नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या संदर्भात आकोट ग्रामिण पोलिस ठाण्याला कळविण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.