आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुने शहरातील कुख्यात आरोपी स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर (वय ३०) याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करीत त्याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले. पोलिस अधीक्षकांच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली. जुने शहरचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या प्रस्तावावरून पोलिस अधीक्षक यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जिल्हाधिकाऱ्यांकडे एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.
स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर याच्यावर बेकायदेशीर मंडळी जमवणे, कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अटकाव करणे, शिवीगाळ करणे, सार्वजनिक मालमत्तेस नुकसान करणे, दुखापत करणे, खंडणी मागणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, चोरी करणे, दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, महिलावर अत्याचार करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही तसेच एमपीडीए अन्वये एक वर्ष स्थानबध्द करण्यात आले होते. तरी सुध्दा तो कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने गंभीर दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलिस अधीक्षक यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.
जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून हा आरोपी कुख्यात असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश १ मार्च रोजी पारीत केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन बुधवारी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे.
ही कारवाई पूर्ण करण्याकरिता पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मंगेश महल्ले यांनी तसेच जुने शहर येथील पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.