आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

851जणांची अनुपस्थिती:एमपीएससी परीक्षा; संयुक्त पूर्व परीक्षा, 16 केंद्रांवर हाेती व्यवस्था

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ नाेव्हेंबरला झाली. जिल्ह्यात ४,४१६ पैकी ३ ५६२ जणांनी परीक्षा दिली असून, ८५१ उमेदवार अनुपस्थित हाेते. १६ केंद्रांवर परीक्षा झाली. यापूर्वी ८ ऑक्टाेबरला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परीक्षा झाली हाेती.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परीक्षा शांततेत हाेण्याकरता परीक्षा केंद्राच्या आतील परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी कामकाज पाहिले. परीक्षा सुरळीतपणे हाेण्यासाठी एकूण ४ समन्वक अधिकारी कार्यरत हाेते. यात बळवंत अरखराव, सुनील पाटील, वि.अ. जंजाळ, अनिल चिंचाेले यांचा समावेश हाेता. परीक्षा केंद्र परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. हे काम अकाेल्याचे उपविभागीय पाेलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांनी पाहिले.

बातम्या आणखी आहेत...