आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:आज एमपीएससी परीक्षा; 16 केंद्र, 4416 उमेदवार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी ५ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. जिल्ह्यात ४ हजार ४१६ जण एकूण १६ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. यापूर्वी ८ ऑक्टाेबर राेजी दुय्यम सेवा अरापत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परीक्षा झाली झाली हाेती.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परीक्षा शांततेत हाेण्याकरता परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून िनवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे हे कामकाज पाहणार आहेत. परीक्षा सुरळीतपणे हाेण्यासाठी एकूण ४ समन्वक अधिकारी कार्यरत राहणार आहेत. यात श्री. अरखराव, सुनील पाटील, वि.अ. जंजाळ, अनिल चिंचाेले यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...