आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात1200 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत:महावितरणची कठोड कारवाई, ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याच्या सुचना

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात 1 जूनपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कठोर मोहिम राबविली जात आहे. वीलबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सरळ खंडीत करण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत या महिन्यामध्ये 20 दिवसात महावितरणकडून वीजबिल न भरणाऱ्या तब्बल 1247 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यातील 551 ग्राहक ग्रामीण भागातील आहेत.

वीज पुरवठा खंडीतची आकडेवारी

अकोला शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे थकबाकी वसूली सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील अनेक उपविभागीय केंद्रावरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये अकोला ग्रामीण उपविभाग 46, अकोला शहर क्र. 1 मध्ये 73, अकोला शहर क्र. 2 मध्ये 88, अकोला शहर क्र. 3 मध्ये 150, बार्शीटाकळी 142, बाळापूर 197 मूर्तिजापूर 99, पातूर 67, अकोट 226, तेल्हारा 159 या उपकेंद्रावरील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

....अन्यथा कायमस्वरूपी पुरवठा खंडीत

सध्या महावितरणकडून वीलबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा विज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी खंडीत करण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांनी ठराविक मुदतिमध्ये वीजबिल भरले नाहीतर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

कृषीपंप ग्राहकांना दिलासा

अकोला जिल्हा कृषी पंपाचे थकबाकी ही मोठी आहे. मात्र सध्या ही कारवाई कृषीपंप ग्राहकांना वगळून करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचे दिवस आहे. त्यामुळे कृषीपंपाच्या वीजपुरवठा खंडीत केला जाणार नाही. मात्र, शेतकऱ्यांनी स्वत:हून थकीत वीलबील भरण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...