आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मचक्र प्रवर्तन दिन:मुंबई- नागपूर, नागपूर- पुणे आणि अजनी-मुंबई या विशेष गाड्या शुल्कासह चालवणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि अजनी ते मुंबई या विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे.

अशा आहेत गाड्या

नागपूर- मुंबई वन वे स्पेशल

01017 एकेरी सुपरफास्ट विशेष नागपूर येथून 06 ऑक्टोबर रोजी 08.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी 23.00 वाजता पोहोचेल. थांबे सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.

नागपूर - पुणे वन वे विशेष

01030 एकेरी सुपरफास्ट विशेष बुधवार 5 ऑक्टोबर रोजी नागपूर येथून 19.40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.

अजनी - मुंबई वन वे स्पेशल

01011 एकेरी सुपरफास्ट वविशेष अजनी येथून गुरूवार 06 ऑक्टोबर रोजी 19.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 11.20 वाजता पोहोचेल.

अजनी येथे गाड्यांना एक मिनिट तात्पुरता या गाड्या थांबा देईल

 • 05 ऑक्टोबर मुंबईकडे
 • 12860 हावडा - मुंबई गीतांजली एक्सप्रेस;
 • 22137 नागपूर - अहमदाबाद एक्सप्रेस,
 • 12810 हावडा- मुंबई मेल व्हाया नागपूर,
 • 22906 शालीमार - ओखा एक्सप्रेस,
 • 12843 पुरी - अहमदाबाद एक्सप्रेस,
 • 12130 हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेस,
 • 12146 पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,
 • 12834 हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस एक्सप्रेस
 • 05 ऑक्टोबर रोजी नागपूरकडे
 • 22511 लोकमान्य टिळक टर्मिनस - कामाख्या एक्सप्रेस, 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस,
 • 12129 पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस,
 • 12809 मुंबई- हावडा मेल व्हाया नागपूर,
 • 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर एक्सप्रेस, 12833 अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस,
 • 12859 मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस
 • 20824 अजमेर -पुरी एक्सप्रेस
 • 06 ऑक्टोबर रोजी मुंबईकडे
 • 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस,
 • 12810 हावडा- मुंबई मेल नागपूर मार्गे,
 • 12102 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस,
 • 20861 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस,
 • 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस,
 • 12849 बिलासपूर- पुणे एक्स्प्रेस,
 • 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस.
बातम्या आणखी आहेत...