आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाले, गटारींच्या स्वच्छतेला सुरुवात:अकोला महापालिकेडून शहरातील मोठ्या नाल्यांची जेसीबी मशिनद्वारे सफाई सुरू

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम जेसीबी मशिनच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. मान्सून तोंडावर आला असताना महानगरपालिका क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई 50 टक्केच झाली होती. तर मोठ्या नाल्यांची सफाई संथगतीने सुरू होती.

मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्यास जोरदार पाऊस आला की, मोठ्या नाल्यातील पाणी वाहून न जाता सखल भागात नागरिकांच्या घरात शिरते. मागील वर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईस विलंब झाल्याने शहराच्या विविध भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीही नाल्यांची सफाई न केल्याबाबत शिवसेनेचे माजी गटनेते राजेश मिश्रा यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या नाल्यांची सफाई गतीने न सुरू केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता महापालिका प्रशासनाने मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरू केले आहे.

झोननिहाय जेसीबी मशिनने मोठ्या नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, नाला सफाई पूर्ण होण्याच्या आधी जोरदार पाऊस झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शहरातील एकूण 249 लहान-मोठ्या नाल्यांपैकी मे महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ 125 नाल्यांचीच सफाई झाली होती. तर उर्वरित नाल्यांमध्ये मोठ्या नाल्यांचा समावेश होता. मात्र आता प्रशासनाने नाला सफाईचे काम सुरु केले आहे. सर्वाधिक नाले पूर्व झोनमध्ये असून सर्वात कमी नाले पश्चिम झोनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...