आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामबंद आंदोलन:नगरपालिका कर्मचारी संघटनेचे 1 मेपासून कामबंद आंदोलन; शासनाकडून कोणतीही पुर्तता होत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नगरपरिषद व नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत १ मे २०२२ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे. आतापर्यत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अनेकदा निवेदन देऊन व आंदोलन करुन सुद्धा शासनाकडून कोणतीही पुर्तता होत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यासह अकोला जिल्हयातील नगरपरिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष तथा संघटना प्रमुख विश्वनाथ घुगे, राज्याध्यक्ष सुरेश पोसताडेल, राज्य सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, राज्य कोषाध्यक्ष अनिल पवार, राज्य संघटक दीपक रोडे, प्रमुख सल्लागार धर्मा खिल्लारे, राज्य समन्वयक गजानन इंगळे तथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक राज्य अध्यक्ष जयसिंगजी कच्छावाह महामंत्री पी बी भातकुले, दिलीप अण्णा चांगरे कार्यकारी अध्यक्ष अनुपजी खरारे यांच्या नेतृत्वात संपुर्ण महाराष्टभर तीन टप्पयातील आंदोलन करण्याचा निर्धार केला अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप रावणकर यांनी दिली.

यामध्ये ५ एप्रिलला सर्व नगरपरिषद कर्मचारी काळ्याफीती लावून निदर्शने करुन काम करणार असून, बुधवारी २० एप्रिलला महात्मा गांधी मैदान वरळी, मुंबई येथून संचालक नगर परिषद प्रशासन वरळी मुंबई यांच्या कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन केले जाईल. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास १ मे या महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर कामबंद आंदोलन सुरू करणार आहे.

राज्यातील नगरपरिषदांमध्ये रोजंदारी कर्मचारी यांचे विनाअट समावेशन करणे, सहायक अनुदानाऐवजी १०० टक्के वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत देणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने देणे १०,२०,३० वर्षाशी आश्वासीत प्रगती योजनाविना अट लागू करणे या व इतर मागण्यांसाठी अकोला जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणी आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले.

या करीता प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप रावणकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, जिल्हासचिव दीपक सुरवाडे, स्थानिक अध्यक्ष इश्वरदास पवार अकोट, भरत मलीये तेल्हारा, नागोराव सुरजुसे बाळापुर, शीरीष गांधी मुर्तीजापुर, सै रसुल सै चांद पातुर, रुपेश पिंजरकर बार्शीटाकळी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील नगररिषद व नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार या तीन टप्यातील आंदोलन यशस्वी करण्यात येईल, असे अकोला प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप रावणकर यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...