आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले:मनपाचे मानसेवी कर्मचारी होणार कंत्राटी

अकोला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत मागील २२ वर्षांपासून मानसेवी म्हणून कार्यरत असलेले ११२ कर्मचारी आता कंत्राटी होणार आहेत. प्रशासनाने या आशयाच्या नोटीस बुधवारी मानसेवी कर्मचाऱ्यांना बजावल्या. त्यामुळे २२ वर्षाच्या सेवेचे हेच ते काय फलीत? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. मात्र या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवरील स्थायी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून ११३ मानसेवी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यातील ११२ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.

आस्थापना खर्च कमी कसा होईल?
आस्थापना खर्च कमी करण्यासाठी महापालिकेला उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. मात्र उत्पन्न वाढवण्याकडे दुर्लक्ष करुन केवळ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा प्रकार महापालिकेत सुरु आहे. विशेष म्हणजे मानसेवी म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेतल्यास वेतन द्यावेच लागणार आहे. त्यामुळे मुळात आस्थापना खर्च कमी होणारच नाही. उलट कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केल्यास कंत्राटदाराला कमीशन द्यावे लागणार असून, कर्मचाऱ्यांना वेतन कमी मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...