आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:मुख्य रस्त्यावर आजपासून मनपाची अतिक्रमण हटाव धडक मोहीम

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मार्गालगत लघु व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण त्यांचे नुकसान होवू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने लघु व्यावसायिकांना रविवारपर्यंत मुदत दिली होती.

मात्र रविवारपर्यंत चित्र जैसे-थे होते. परिणामी सोमवारपासून शहराच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटाव धडक मोहीम राबवली जाणार आहे. शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खासगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात.

पहिल्या टप्प्यात या मार्गावर राबवली जाणार मोहीम
पूर्व झोन अंतर्गत दक्षता नगर चौक ते रेल्वे स्टेशन रोड, नेहरू पार्क चौक ते बिर्ला गेट, मुख्य पोस्ट ऑफिस ते सुधीर कॉलनीपर्यंतचा रस्ता, उत्तर झोन अंतर्गत ओपन थिएटर ते माल धक्का, सिटी कोतवाली ते मंगला होटेल अकोट फैलपर्यंत, गांधी चौक ते ताजना पेठ पोलिस चौकी ते फतेह चौक, दक्षिण झोन अंतर्गत हुतात्मा चौक ते संत तुकाराम चौक पर्यंत, दक्षता नगर चौक ते कौलखेड चौक या मार्गावर मोहिम राबवणार आहे. सोमवारी यापैकी कोणत्या मार्गावर ही मोहीम राबवली जाणार हे आज स्पष्ट होईल

बातम्या आणखी आहेत...