आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग:महापालिकेच्या बाजार विभागाने इक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबचा परवाना रद्द करुन ठोकले सील!

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोचिंग क्लास मधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासात पीडित विद्यार्थीनी सोबत घडलेल्‍या प्रकाराचे ठिकाण कोचींग क्‍लास व लायब्ररी असल्‍याचे आढळून आल्याने आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये इक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबचा परवाना रद्द करुन सील लावण्यात आले.

पुर्व झोन अंतर्गत तोष्‍णीवाल ले-आऊट येथे चौधरी कोचींग क्‍लास नावाचा कोचींग क्‍लासेसचा व्‍यवसाय असून या व्‍यवसायाच्‍या आड मध्‍ये अल्‍पवयीन विद्यार्थींनीशी अश्‍लील मॅसेज पाठविणे, विनय भंग करणे बाबतची तक्रार एका विद्यार्थीनीने दिल्यानंतर या प्रकरणात चौधरी कोचिंग क्‍लासेसचे संचालक शेख वसीम शेख जमीलविरूद्ध पॉस्‍को कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल झाला.

या कृत्‍यामुळे चौधरी कोचींग क्‍लासेस मध्‍ये शिकणाऱ्या मुला मुलीच्या पालकांमध्ये दहशत तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी तोष्‍णीवाल ले-आऊट येथे ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब या नावाने लायब्ररी असून या लायब्ररीचे 2020-2023 च्या महानगरपालिकेचे टॅक्‍स पावतीवर लायब्ररीचे मालक म्हणून शेख वसीम शेख जमील, शेख नाझीम शेख जमील, शेख तनजीम शेख जमील अशी तिघांची नावे नमुद आहेत. ही बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली तसेच पिडीत विद्यार्थींनी सोबत घडलेल्‍या प्रकाराचे ठिकाण कोचींग क्‍लास व लायब्ररी असल्‍याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.

या अनुषंगाने महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब मनपा व्‍यवसाय परावाना रद्द करून ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबला मनपा पुर्व झोन कार्यालय आणि बाजार/परवाना विभागाव्‍दारे सील लावण्‍यात आले.

या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, सिव्‍हील लाईन पोलीस स्‍टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर खोंड, सहा.कर अधिक्षक देवेंद्र भोजने, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर, तुषार जाने, कृष्‍णा वाकोडे, दिपराज महल्‍ले, दादाराव सदांशिव, बाजार विभागाचे गौरव श्रीवास, रवि निवाने, संजय पाचपोर, निखील लोटे, सुरेंद्र जाधव तसेच पोलीस कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...