आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जुलैपर्यंत नोंदवता येणार हरकती:महापालिका निवडणुकीची प्रभाग निहाय मतदार प्रारुप यादी प्रसिद्ध

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहिर केला होता. या प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या 23 जुन रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या, अशी माहिती महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिली. या मतदार याद्यांवर 1 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत मतदारांना हरकती देता येणार आहे.

मतदार यादीत 31 मे पर्यंत ज्यांनी 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण केले आणि त्याची नोंद केली असल्यास त्यांचा नावाचा समावेश यादीत करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने 457 बीएलओ नियुक्त होते. तर या बिएलओ यांच्यावर 20 अधिकारी सुपरवायझर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या मतदार याद्या अकोला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (https://www.amcakola.in), अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय तसेच प्रभागाची यादी संबंधित पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण क्षेत्रीय कार्यालयामध्ये (झोन कार्यालय) पाहण्यास उपलब्ध करण्यात आली आहे.

मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या मतदारांना करता येणार आहेत.

या मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांमध्ये बदल करुन 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. तसेच महापालिका क्षेत्रातील मतदारांनी आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये असल्याची खातरजमा करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...