आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गिरी नगरातील अतिक्रमणावर मनपाची कारवाई

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी ९ डिसेंबरला जुना आरटीओ कार्यालय मार्गावरील गिरी नगर ते संत तुकाराम चौक या भागातील अतिक्रमणावर कारवाई केली. रस्त्यावर बांधलेले ओटे, संरक्षक भिंत, टिनशेड जमिनदोस्त करण्यात आले.

जुना आरटीओ कार्यालय ते संत तुकाराम चौक हा रस्ता १८ मीटरचा आहे. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला. व्यावसायिकांनी दुकानासमोर तर घर मालकांनी घरासमोर ओटे बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हे अोटे बांधल्याने रस्ता अरुंद झाला. तर काही जणांनी टिनशेड उभारले तर काहींनी संरक्षक भिंत उभारली.

पथकाने वाहतुकीस अडथळा ठरलेले, रस्ता अरुंद करणारे अतिक्रमण जमिनदोस्त केले. ही मोहीम दक्षिण झोनचे झोनल अधिकारी दीपक निकाळजे, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे,अतिक्रमण हटाव विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाळे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धीरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ताचे अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली. दरम्यान ही मोहीम नियमितपणे दररोज विविध मार्गावर राबवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...