आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या मुळ तसेच हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. या अनुषंगाने 5 ऑगस्ट रोजी या विकास योजनेच्या कामाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस दुपारी 2:30 ते 4 या दरम्यान शहरातील सर्व सामान्य नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे.
नगरपालिका असताना 1991 मध्ये शहराची हद्दवाढ झाली होती. यात कौलखेड पूर्ण गाव तसेच खडकी, मलकापूर, उमरी आदी गावातील काही भागाचा नगरपालिकेत समावेश करण्यात आला. तर 2016 मध्ये महापालिकेची हद्दवाढ झाली. यात 21 गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. महापालिकेची मुळ हद्द तसेच वाढीव भागातील विविध स्तरावरील समस्या, त्या अनुषंगाने विद्यमान सोयी सुविधा आणि अपेक्षित सोयी सुविधांबाबत या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख, शहरातील राजकीय पदाधिकारी, विविध विषयाचे तज्ज्ञ तसेच शहरातील सर्व सामान्य नागरिक यांच्यासोबत अकोला महापालिका आणि नगर रचना विकास योजना पवईचे उपसंचालक यांच्या विद्यमाने 5 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळेत होणार चर्चा
सकाळी 10 ते 11 शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा, 11:30 ते 12:30 महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, 12:30 ते 1:30 वृत्तपत्र प्रतिनिधींसोबत चर्चा, नंतर 1:30 ते 2:30 भोजन अवकाश आणि त्यानंतर 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत सर्व सामान्य नागरिकांसोबत आढावा बैठक घेतली जाणार आहे. या आढावा बैठकीला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून विकास योजनेसंदर्भात मार्गदर्शन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.