आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:डोक्यात लाकडी दांडा मारुन तरुणाची हत्या; बाळापूर तालुक्यातील घटना, आरोपी फरार

बाळापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उरळ येथील शेगाव ते अकोला मार्गालगत असलेल्या धार्मिक स्थळावर एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्या युवकाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार शनिवारी ७ मे राेजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. पवन सहदेव वानखडे राहणार झोपडपट्टी उरळ, असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उरळ येथील ठाणेदार अनंत वडतकार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अकोला येथून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून त्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकाेला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठवला.

या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ६ मे राेजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने युवकाला लाकडी फळीने मारहाण केली. त्याच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी उरळ येथील पोलिस पाटील महादेव घोडस्कार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला.

संशयित आरोपीचा शोध सुरू
मृत पवन वानखडे याच्या डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला तेथेच टाकत संशयित आरोपीने पलायन केले. उरळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मारेकरी हा मृस युवकाच्या जवळचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, संशयित आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान संशयिताशिवाय अन्य आरोपी आहेत का? यांचाही शोध घेतला जात आहे. सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. नेमका खून कशासाठी केला यांचाही तपास सुरू आहे. दरम्यान मृत युवकावर यापूर्वी अनेक प्रकरणात उरळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...