आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिबिल कायदा रद्द करा, या मागणी करता बैलबंडीसह काढण्यात आलेल्या महामोर्चात सहभागी शेतकऱ्यांच्या घोषणांनी मंगळवारी शहर दणाणून गेले होते. शेतकऱ्यांचे पीक कर्ज सिबिलमध्ये अडकण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी जागरमंचच्या वतीने साेमवारी १ मे रोजी उपविभागीय कार्यालयावर संयोजक प्रशांत गावंडे व जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला.
या महामोर्चास विश्रामगृहापासून सुरुवात झाली होती. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी या सिबिल विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. शेतीसाठी पीक कर्जाची मोठी आर्थिक मदत शेतकऱ्यांना होत असते. पीक कर्जाअभावी शेती करणे शेतकऱ्यांना मोठे अडचणीचे आणि जिकरीचे ठरू शकते. शेतीसाठी शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज मिळावे म्हणून स्वातंत्र्यानंतर सत्तेतील सरकारांनी जिल्हा बँक, विकास बँक, ग्रामीण बँक शेती वित्त महामंडळे अशा अनेक व्यवस्था निर्माण केल्या. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुदतीचे कर्ज, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी लागणारे कर्ज मिळण्याची व्यवस्था करण्यात येऊन शेतकरी व शेती समृद्ध होईल, या दिशेने वाटचाल करण्यात आली.
भारतीय रिझर्व बँकेने यावर्षीपासून खरीप हंगाम 2023 पासून सर्व बँकांना सिबिल तपासूनच शेतकऱ्यांना कर्ज वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारने देखील अशाच पद्धतीने कर्ज वितरीत करण्याचे मान्य केलेले आहे. म्हणजे 90 टक्के शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरणार नाहीत. राज्यातील विविध बँका आपल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे प्रति एकरी खरीप व रब्बी हंगामासाठी कर्जाचे वाटप करीत असते. परंतु, आता शासनाने सिबिल आणल्याने सिबिलच्या गुणांकनामध्ये अंदाजे ९० टक्के शेतकरी हे पीक कर्जासाठी अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कारण कर्जमुक्तीच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज भरले नव्हते. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना बोलावून वन टाइम सेटलमेंट करून घेतल्याने या वन टाइम सेटलमेंटमुळे सिबिलचा स्कोर जुळत नाही आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येकडे वळावे लागते की काय? अशी भीती या वेळी संयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
शासनाने शेतकऱ्यांना सिबिलमधून सूट द्यावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळत नाही. त्यामुळे सर्व अटी रद्द करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच कर्जाचे वितरण व्हावे, अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतली होती. याबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना देण्यात आले. या वेळी प्रशांत गावंडे, सम्राट डोंगरदिवे, अॅड. भय्यासाहेब तिडके, अक्षय राऊत, श्रीकृष्ण बोळे, सुरेश जोगळे, अरविंद तायडे यासोबत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पुंडलीक अरबट, शांताराम काळे, प्रदीप ढाेले, दामाेदर मार्के, गाैरव यादगिरे, डाॅ. अशाेक बिहाडे, हरिदास वाघ हे विजयी झाले. महिला मतदारसंघातून विजया ताथाेड, वंदना वाघाेडे निवडून आल्या. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संदीप खाराेडे, निरधीसूचित जमाती( िवमुक्त जाती) भटक्या जमाती मतदारसंघातून शाम घाेंगे विजयी झाले. ग्राम पंचायत मतदारसंघातून रवींद्र बिहाडे, माेहन पाथ्रीकर निवडून आले. ग्रा.प. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सुनील इंगळे, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून निरंजन राजनकर विजयी झाले. व्यापारी-अडते मतदारसंघातून हरिषकुमार तापडीया, राजेश टेकडीवाल आणि हमाल-मापारीमधून सुभाष खाडे निवडून आले.
मूर्तिजापूर येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकरी महामोर्चाने धडक दिल्यानंतर शेतकरी जागरमंचच्या वतीने सिबिल कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी माेर्चासंदर्भातील भूमिका विशद केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.