आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Musical Welcome Of New Year From The Students Of 'Prabhat', Brilliant Presentation Of Marathi Nursery Rhymes; Experience The Padva Pahat Of New Year By Performing Marathi Nursery Rhymes | Marathi News

निमित्त पाडव्याचे:‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांकडून नववर्षाचे संगीतमय स्वागत, मराठी बालगीतांचे केले बहारदार सादरीकरण; मराठी बालगीते सादर करुन नववर्षाच्या पाडवा पहाटची अनुभूती

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नववर्षाचे औचित्य साधून प्रभात किड्स स्कूलच्या मराठी विभागाद्वारे ‘स्वागत मराठी नववर्षाचे’ हा बहारदार मराठी बालगीतांचा संगीतमय कार्यक्रम मंगळवारी ५ एप्रिलला बालगोपाळांसाठी आयोजित करण्यात आला. ‘प्रभात’च्या चिमुकल्या गायकांनी विविध मराठी बालगीते सादर करुन नववर्षाच्या पाडवा पहाटची अनुभूती दिली. कार्यक्रमाची मगंलमय सुरूवात अंतरा गद्रे या विद्यार्थीनीने सादर केलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरा’ या गीताने झाली. त्यानंतर पलाशा देशपांडे, निषाद ढोकणे, वैष्णवी खैरे, अक्षरा पाटेकर, संचिता लाहोळे, स्वराली चापके, स्वरेश चापके व परिणिता बारापात्रे यांनी एकापेक्षा सुंदर अशी मराठी बालगीते सादर केली. अमृता वडतकर हीने सादर केलेल्या ‘नाच रे मोरा नाच’ या गीतावर चिमुकल्या अक्षया खुरपे हीने सुंदर नृत्य सादर केले. शिक्षिका रश्मी देव यांनी सादर केलेल्या ‘या लाडक्या मुलानों’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वाद्यवृंद पुष्कर भोयर (ऑक्टोपॅड), आदित्य वाघमारे, रुद्राक्ष गोतरकर (सिंथेसायझर), जागृती खुरपे (तबला) यांच्यासह शिक्षक आशिष खुरपे (तबला), नंदकिशोर डंबाळे (ढोलकी), विजय वाहोकार (हार्मोनियम) यांनी साथसंगत दिली. कृष्णाई देशमुख, ईश्वरी पाटील व माधव हर्षे यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचालन करुन कार्यक्रमात एकच रंगत आणली तर आभार प्रदर्शन सहायक समन्वयक भावना राऊत यांनी केले. या वेळी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे, मराठी विभागाच्या अनुराधा माहोरे, प्रज्वल अरघोडे, आनंद जोशी, रोहित हिवरकर, कविता कोल्हाळे, वर्षा दांडगे, कविता विखे, स्मिता जंगले, अरुणा वाघमारे यांच्यासह दिनेश पाटील, संजय पाटील, सुरज भांगे, प्रमोद गोलडे, प्रशिक गोंडाणे, आशिष बेलोकार, संगीत विभागाचे अतुल डोंगरे, तंत्र-ध्वनी संयोजक सचिन मुरुमकार, श्रीकांत बुलबुले व प्रशांत तळोकार यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...