आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आज नागपंचमी  : सापांना जाणून घेण्याची आवश्यकता : सर्पमित्रांचे आवाहन

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात सापांचा संचार वाढतो. अन्नाच्या शोधात साप फिरतात. सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीच्या ठिकाणी साप राहतात. मात्र त्यांच्या क्षेत्रात बिनधास्तपणे किंवा कुठलीही खबरदारी न घेता आपण वावरलो तर सर्पदंश होतो. मात्र प्रत्येक साप हा विषारीच असतो असे नाही. त्यामुळे सापांविषयी गैरसमज, अज्ञान दूर करून सापांना जाणून घेण्याची गरज आहे.

सर्पदंश टाळण्यासाठी विशेष करुन पावसाळ्यात अडचणीच्या ठिकाणी वावरताना सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ असे आवाहन सर्पमित्रांकडून नागपंचमीनिमित्त करण्यात येते.पावसाळ्याला सुरुवात होताच शहरी, ग्रामीण भागात सापांचा संचार वाढतो. अशातच अडचणीची ठिकाणे किंवा गवताळ भागात वावरताना सावधगीरी न बाळगल्यास सर्पदंशांचे प्रमाण वाढते. साप खाद्याच्या शोधात मानवी वसाहतींच्या शेजारी वावरत असल्याने घरात, गोठ्यात साप निघणे, गवतात सापावर पाय पडल्यास, शेतात काम करताना सर्पदंश होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सुरक्षात्मक खबरदारी घेतल्यास सर्पदंश टाळता येतात, असे अभ्यासक सांगतात.

सापांना जाणून घ्या
सापांबद्दल नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. अज्ञान आहे. प्रत्येक साप हा विषारी असतो, अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळे सापांना समजून घेतले पाहिजे. पावसाळ्यात अडचणीच्या ठिकाणी वावरताना सुरक्षात्मक खबरदारी घेतल्यास सर्पदंश टाळणे शक्य होते.- दीपक दाखोरे, सर्पमित्र

अशा ठिकाणी आढळून येऊ शकतात साप
वाढलेले गवत, जुनी ढिगारं, पडकी घरं, अडचणीचा परिसर, शेतशिवार, कुटाराचे उघड्यावरील ढीग, लाकडांची गंजी, विटा, दगड मातींचे ढीग या भागात साप आढळण्याची शक्यता असते. रात्री शेतात टॉर्च आणि लांब बूट वापरावे. अमोल नवले, सर्पमित्र

बातम्या आणखी आहेत...