आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य करंडक:आठव्या स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेत नागपूर प्रथमस्थानी

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धी गणेश प्रॉडक्शनच्या वतीने आयोजित आठव्या स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत नागपूरच्या ‘दर्दपोरा’ नाटकाने बाजी मारली आहे. १५ ऑगस्टला शहरातील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेत अमरावतीच्या ‘जत्रा’ नाटकाने द्वितीय स्थान पटकावले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी विष्णू निंबाळकर, परीक्षक रावबा गजमल, परीक्षक निखिल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भातील निवडक ९ एकांकिकांचे स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावजी, प्रा. मधू जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी विष्णू निंबाळकर, नगरसेवक मनपा हरीश अलीमचंदानी यांची उपस्थिती होती. अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत स्पर्धेला हजेरी लावली. स्पर्धा आयोजनासाठी अक्षय पिंपळकर, मंदार घेवारे, मयूर भालतिलक, रोशन समुद्रे यांनी परिश्रम घेतले.

उपस्थित प्रेक्षकांचे आणि स्पर्धकांचे आभार आयोजक सचिन गिरी यांनी मानले.विविध कॅटेगिरीमध्ये नवीन लिखाणासाठी अंकित जवळेकर (देऊळ), नेपथ्यमध्ये प्रथम शुभम स्थूल (जत्रा), द्वितीय अश्विनी जवळेकर (देऊळ) आणि तृतीय तुषार काकड (अकांत) पुरस्कार मनश्री आर्टतर्फे देण्यात आला. प्रकाश योजना अभिषेक घागरेकर (दर्दपोरा), दीपक नांदगावकर (जत्रा), अजय इंगळे (देऊळ), पार्श्वसंगीत प्रणव कोरे(जत्रा), तन्मय दिग्रस्कर(देऊळ), रवी सोईतकर(दर्दपोरा), हर्षद ससाने(वीसच गणित), अभिनय उत्तेजनार्थ वैष्णवी राजपुरे (देवकी, वीसच गणित), शुभम स्थुल (अब्दुल, जत्रा), गोविंद सावजी (डक्टर, आकांत), अभिलाषा गोळे ( सेकंड हॅन्ड), पूजा इंगोले (विना, वीसच गणित), विशेष बालकलाकार श्रावणी जैन (छकुली, जाणीव), दिग्दर्शक उत्तेजनार्थ कल्पक दिग्दर्शक विशेष पुरस्कारतर्फे विशाल तराळ अमरावती, अजय इंगळे (आकांत), दीपक नांदगावकर (जत्रा), तुषार काकड (देऊळ), अनिकेत चवरे (दर्दपोरा), एकांकिका विशेष लक्षवेधी एकांकिका, विशाल तराळ अमरावतीतर्फे व्हॅलेंटाइन डे (हिमानी फाउंडेशन अकोला) यांना प्रदान करण्यात आला.

हे ठरले मानकरी आठवा स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका प्रथम पुरस्कार नाट्य तपस्वी स्व. श्रीराम जाधव (मामा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकांकिका प्रथम ‘दर्दपोरा’ संस्था अरुणोदय, नागपूर, तर द्वितीय एकांकिका स्वतंत्रता सेनानी स्व. मारुती सावजी एकांकिका जत्रा, संस्था गंधर्व, अमरावती आणि तृतीय एकांकिका ‘देऊळ’, संस्था श्री नटराज शैक्षणिक संस्था अमरावती यांना प्रदान करण्यात आला. अभिनय (स्त्री) प्रथम अनुराधा वाटडेकर (कौशल्या, जत्रा), द्वितीय प्राची ढोके (अक्का, देऊळ) रोटरी क्लब अकोला ईस्टतर्फे देण्यात आला, गौरी पुरकर (पल्लवी, व्हॅलेंटाइन डे), दीप्ती भागे (मुस्कान), अभिनय (पुरुष) विशेष पुरस्कार अभिनय प्रथम वैदही चावरे (नूर, दर्दपोरा), वैभव ओगले (तो. आकात), शुभम ठाकरे (विठ्ठल, जत्रा) यांना प्रदान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...