आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य करंडक स्पर्धेत नागपूरचे नाटक अव्वल:अमरावतीने पटकावला द्वितीय क्रमांक, 9 बहारदार नाटकांचे सादरीकरण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठव्या स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाला जाहीर झाला असून, स्पर्धेत नागपूरच्या 'दर्दपोरा' नाटकाने बाजी मारली आहे. 15 ऑगस्टला शहरातील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत अमरावतीच्या 'जत्रा' नाटकाने द्वितीय स्थान पटकावले आहे. या नाटकाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी विष्णू निंबाळकर, परीक्षक रावबा गजमल, परीक्षक निखिल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भातील निवडक 9 एकांकिकांचे स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावजी, प्रा. मधू जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी विष्णू निंबाळकर, नगरसेवक मनपा हरीश अलीमचंदानी यांची उपस्थिती होती. अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत स्पर्धेला हजेरी लावली.

हे ठरले मानकरी

आठवा स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका प्रथम पुरस्कार नाट्य तपस्वी स्व. श्रीराम जाधव ( मामा ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकांकिका प्रथम 'दर्दपोरा' संस्था अरुणोदय, नागपूर, तर द्वितीय एकांकिका स्वतंत्रता सेनानी स्व. मारुती सावजी एकांकिका जत्रा, संस्था गंधर्व, अमरावती आणि तृतीय एकांकिका 'देऊळ', संस्था श्री नटराज शैक्षणिक संस्था अमरावती यांच्या नावांचा समावेश आहे.

अन्य कॅटेगिरीतील पुरस्कार

नवीन लिखाण अंकित जवळेकर( देऊळ), नेपथ्य शुभम स्थूल ( जत्रा), प्रकाश योजना अभिषेक घागरेकर ( दर्दपोरा), पार्श्वसंगीत प्रणव कोरे ( जत्रा), अभिनय ऊतेजनार्थ वैष्णवी राजपुरे ( देवकी, वीसच गणित), शुभम स्तुल ( अब्दुल, जत्रा), गोविंद सावजी ( डॉक्टर, आकांत), अभिलाषा गोळे ( सेकंड हॅन्ड), पूजा इंगोले ( विना, वीसच गणित ), विशेष बालकलाकार श्रावणी जैन ( छकुली, जाणीव ), अभिनय (स्त्री ) अनुराधा वाटडेकर ( कौशल्या, जत्रा), अभिनय (पुरुष) वैदही चावरे ( नूर, दर्दपोरा), दिग्दर्शक विशेष पुरस्कार विशाल तराळ अमरावती, याशिवाय विशेष लक्षवेधी एकांकिका, विशाल तराळ अमरावती तर्फे व्हॅलेंटाईन डे यांनी प्राप्त केला.

बातम्या आणखी आहेत...