आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1995 च्या दरम्यान मी सोलापुरातून पोलिसात भरती झालो होतो. त्यानंतर अकोल्यात ट्रेंनिंग ठरलेले होते. पण मी अवघ्या तेरा दिवसच काम करून अकोल्यात यायच्या आधीच ती नोकरी सोडून दिली. तेव्हा पाहून अकोला हे माझ्या अधिक आठवणीत आहेत. आज कवितेने मला अकोल्यात व्यासपीठावर बसवले आहे. अन्यथा मी दंडा किंवा बंदूक घेऊन उभा असतो अशी आठवण कवी व सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अकोल्यातील एका कार्यक्रमात सांगितली.
अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या पोलिस लॉनजवळ शनिवारी, 7 जानेवारीपासून दोन दिवशीय 10 व्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाला सुरूवात झाली. नागराज मंजुळे हे या संमेलनाचे उद्घाटक होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अकोल्याविषयीच्या आठवणी जागृत करून या शहरात योगायोगाने पहिल्यांचा आल्याची कबुली दिली व संमेलनाला शुभेच्छा दिल्या. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला यांच्या संयुक्तपणे आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त तथा ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे होते. यावेळी स्वागताध्यक्ष सुगत वाघमारे, गझलनवाज भीमराव पांचाळे, डॉ. गजानन नारे, प्रा. संजय खडसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कवी किशोर बळी यांनी उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन केले. यावेळी विविध गझलसंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दिवसभरात मुशायरा, गजल गायक मैफिल आदी कार्यक्रम साजरे झाले.
मी वास्तवात नव्हे पण आगामी सिनेमात पोलिस
नागराज मंजुळे म्हणाले की, मी वास्तवात अकोल्यात येऊन पोलिस होऊ शकलो नसलो तरी आगामी चित्रपणात एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या 'घर बंदुक बिर्याणी' नावाचा चित्रपट करतो. त्यामध्ये मी पोलिसाची भूमिका केली आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट येणार आहे. त्यानिमित्त अकोल्यात येता आलं तर पाहू असा शब्दही मंजुळे यांनी यावेळी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.