आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांनंतर युवकाचा मृतदेह सापडला:नाल्यातील जेसीबीत झोपला असताना गेला होता वाहून, मृत बिहारचा मजूर

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 तासांच्या अखंड शोधमोहीमेनंतर युवकाचा मृतदेह शोधण्यास माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकाला यश आले. - Divya Marathi
24 तासांच्या अखंड शोधमोहीमेनंतर युवकाचा मृतदेह शोधण्यास माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकाला यश आले.

अकोल्या तालुक्यात गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेला एक युवक वाहून गेला होता. अखेर 24 तासांच्या अखंड शोधकार्यानंतर युवकाला शोधण्यात यश आले. आज सकाळी सात वाजता युवकाचा मृतदेह आपत्कालीन पथकाला सापडला. सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद (वय 19) असे मृताचे नाव आहे.

अशी घडली घटना

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या जवळ एक मोठा नाला आहे. येथे गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर चार मजूर याच जेसीबींमध्ये झोपी गेले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहचला. मशीन हळूहळू पाण्यामध्ये जात असल्याचा भास एकाला झाला. त्याने आपल्या जेसीबीमध्ये असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यानंतर या दोघांनी दुसऱ्या जेसीबीमध्ये झोपलेल्या मजूरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढण्यात यश आले. पण दुसरा प्रचंड झोपेत होता, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना जेसीबी उलटला. यामुळे युवक पाण्यामध्ये वाहून गेला.

शोधमोहीमेसाठी 2 पथक, 4 जेसीबी

घटनेमधील चारही व्यक्ती बिहार येथील आहेत. गुरुवारी रात्री पावसाच्या जोर अधिक असल्यामुळे शोधकार्य हाती घेता आले नाही. शुक्रवारी सकाळी कुरणखेड परिसरातील दोन आपत्कालिन पथक आणि पोलिसांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. चार जेसीबी शोधकार्यात जुंपलेले होते. चोवीस तासांच्या अखंड परिश्रमानंतर अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यास माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकाला शनिवारी सकाळी यश आले. आपत्कालीन पथकाचे रणजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख, शहाबाज शहा, संतोष गोगटे, ईश्वर हरणे यांनी शोधकार्य केले.

सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद (वय 19) असे मृताचे नाव आहे.
सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद (वय 19) असे मृताचे नाव आहे.
24 तासांपासून ही शोधमोहीम सुरु होती.
24 तासांपासून ही शोधमोहीम सुरु होती.
बातम्या आणखी आहेत...