आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Nana Patole: BJP Does Not Believe In Democracy And Does Not Want To Appoint A Guardian Minister Because Of The Fear That The Government Will Fall Nana Patole

सरकार पडेल या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार नाही:पालकमंत्रीच नेमायचा नाही ही लोकशाही न मानणारी भाजपची भूमिका- नाना पटोले

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार पडेल या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार सरकार करीत नाही. जनतेचे नुकसान झाले तरी चालेल पण सत्तेत बसून राज्य कसे विकता येईल याच अजेंड्यावर राज्यसरकार काम करते आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते शनिवारी अकोल्यात आले माध्यमांशी बोलत होते.

नाना पटाेले म्हणाले की, महाराष्ट्र सगळ्यात महागडं राज्य झालं आहे. असे असताना राज्यातलं सरकार आणि केंद्रातील सरकार एक शब्दही बोलायला तयार नाही. मलाई खाण्यासाठी व राज्याची बदनामी करण्यासाठी गुवाहटीमध्ये जी काही बदनामी राज्याची झाली याचेही यांना काही घेणेदेणं नाही. मंत्रीमंडळाचा विस्तारही करायचा नाही आणि जिल्ह्यात पालकमंत्रीही नेमायचा नाही ही लाईन आता भाजपाने घेतली आहे. लोकशाहीला न मानणारी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ज्यांना लोकशाहीच माहीती नाही, पालकमंत्रीच माहित नाही यापेक्षा दुर्भाग्य कधीही नव्हते तेवढे दुर्भाग्य भाजपने या राज्याचे करून ठेवले आहे.

देशाला संकटातून गांधी परिवारच वाचवू शकतो

राहूल गांधीच पुन्हा अध्यक्ष व्हावे ही देशभरातील काँग्रेसींची ईच्छा आहे. देश संकटात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाला संकटातून गांधी परिवारच वाचवू शकतो आणि देशाला उभं करण्याची क्षमता फक्त राहूल गांधी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे राहूल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत ही सगळ्या काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावे

राहूल गांधी यांनी 41 हजार रूपयांची टीशर्ट घातली की चार हजाराची? यापेक्षा महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाने बोलावे. देशामध्ये सत्तेमध्ये येत असताना त्यांनी त्याकाळी जी भूमिका मांडली होती. आज शेतकऱ्यांना लुटायचे काम ते करताताहेत, असे पटोले म्हणाले.

भांडणं लावण हा भाजपाचा धंदा

देश विकून देश चालवणाऱ्या लोकांना राहूल गांधीवर टीका करायचा अधिकार नाही. माझ्या वडिलांचे बलिदान या भूमित झाले आहे. मी वडिल गमावला आता माझा देश गमावू देणार नाही आणि म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा त्यांनी सुरु केलेली आहे. सगळ्या धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम राहूल गांधी करीत आहेत. भाजपाचे लोके सत्तापिपासू आहेत. जातीजातीमध्ये भांडणं लावणं हा भाजपाच्या लोकांचा धंदा राहिला आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...