आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगप्रकरणी 53 वर्षांच्या नराधमाला 3 वर्ष सक्तमजुरी:अकोला न्यायालयाचा निर्णय; 4 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या 54 वर्षीय नराधमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गणोरकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला.

चार साक्षीदार तपासले

विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खदान परिसरातील कैलास टेकडी येथे राहतो. 13 डिसेंबर 2020 रोजी पीडित चिमुकलीच्या आईने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात तिने आरोप केला होता की, तिच्या चार वर्षांच्या मुलीला आरोपी विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे याने बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम 354 अ व पोक्सो कायद्याचे कलम 11,12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गणोरकर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरिता चार साक्षीदार तपासले.

तीन हजारांचा दंडही

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे याला भादंविचे कलम 345 अ व पोक्सोचे कलम 11,12 अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड , दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून एएसआय कान्हेरकर व एलपीसी सोनू आडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...