आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राष्ट्रीय अॅप्रेंटिस भरती मेळावा; 178 प्रशिक्षणार्थ्यांची निवड ; भरती मेळाव्याचे आयोजन

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूलभूत प्रशिक्षण, अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन केले. त्यात २३२ जणांनी सहभाग घेतला. त्यात १७८ प्रशिक्षणार्थींची प्राथमिक निवड केली. भरती मेळाव्यात बडवे इंजिनिअरिंग प्रा. लि. औरंगाबाद, युवा शक्ती फाउंडेशन पुणे, डिजिटल वर्ल्ड एज्युकेशन, प्रधानमंत्री कौशल केंद्र, जम्बो मार्ट प्रा. लि. या आस्थापनांनी सहभाग घेतला. मुलाखतीनंतर युवाशक्ती फाऊंडेशन पुणे यांनी ९० कंपन्यांसाठी ४८ प्रशिक्षणार्थांची प्राथमिक निवड केली. टिमप्लस एच आर.यांनी ११ कंपन्यांसाठी ४० प्रशिक्षणार्थांची निवड केली. बडवे इंजिनिअरिंग प्रा. लि.तर्फे ९० उमेदवारांची प्राथमिक निवड केली. राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्यात येते, अशी माहिती प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...