आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालम्पी स्कीन डिसीज या रोगाची साथ २०२० मध्ये प्रथमच महाराष्ट्रात पसरली होती. प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात या रोगाचा प्रसार झाला होता. त्यावेळी महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्था, अकोला येथे डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून पशुवैदयक व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
याचा साथ आटोक्यात आणण्यात फायदा झाला. संस्थेतील डॉ. अनिल भिकाने, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. रवींद्र हातझाडे व डॉ. किशोर पजई यांनी रोग प्रादुर्भाव, लक्षणे व योग्य औषधोपचार पद्धतीवर संशोधन केले. त्यावर आधारित शोध निबंधाचे शुक्रवार ६ व शनिवार ७ मे रोजी आचार्य नरेंद्र देव कृषी विद्यापीठ, अयोध्या येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या वार्षिक अधिवेषनात सादरीकरण करण्यात आले.
पशुवैद्यकीय औषधशास्त्रातील नवकल्पना: वर्तमान स्थिती आणि भविष्यातील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आणि वार्षिक अधिवेशनात प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी रोमाथंक प्राण्यातील रोग या सत्रात सादरीकरण केले. या शोधनिबंध सादरीकरणास समारोपिय कार्यक्रमात नाबार्डचे मुख्य विभागीय व्यवस्थापक एस. के. डोरा यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. वाघमारे यांना पशुवैद्यकीय आंतर आणि प्रतिबंधात्मक औषधी सोसायटीच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल आचार्य नरेंद्र देव कृषी विद्यापीठ कुमार गंज (अयोध्या) कुलगुरू डॉ. बिजेंद्रसिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. जि. के. सिंह (मथुरा), माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, सचिव डॉ अशोक कुमार, अधिष्ठाता डॉ. आर. के. जोशी, आयोजक डॉ. सत्यव्रत सिंग व डॉ. जे. पी. सिंग यांची यावेळी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.