आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियनशिप:राष्ट्रीय रँकिंग तायक्वांदो चॅम्पियनशिप; अकोल्याच्या सहा खेळाडूंची झाली निवड

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिया तायक्वांदो व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल नाशिकला १५ जूनला होत आहे. त्या स्पर्धेसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ अकोला डिस्टिकच्या सहा खेळाडूंची निवड जानोरकर मंगल कार्यालयात केली . त्यात ओम जताले ३३ कॅडेट वजन गट, धनेश चोपडे ४१ कॅडेट वजन गट, वेदांत चोपडे ५५ ज्युनियर वजन गट, तन्मय पवार ४५ कॅडेट वजन गट, तोषित गुलवदे ४९ कॅडेट वजन गट, एंजेल वक्ते ३३ कॅडेट मुलींचा वजन गट या खेळाडूंची निवड झाली असून, जिल्हा संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक शिवाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. हा संघ नाशिक येथे प्रशिक्षक सोम्या लोडिया व संघ व्यवस्थापक शुभम सुर्यवंशी त्यांच्यासोबत रवाना झाला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, जानोरकर मंगल कार्यालयाचे विक्रम जानोरकर, शिवा मोहोड, योगेश तिवारी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...