आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान दिन:विष्णूपंत खेडकर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विष्णूपंत खेडकर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. यानिमित्त गणित व विज्ञान विषयक प्रतिकृती, गणितीय प्रतिकृती, गणितीय रांगोळी स्पर्धा घेतल्या.या कार्यक्रमास मुख्याध्यापक नीलेश खेंडकर, मुख्याध्यापक अल्केश खेंडकर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आशा काळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेमधील उत्कृष्ट दोन मॉडेल व प्रतिकृतींची निवड केली. कार्यक्रमाचे आभार उषा ऊबाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल वानखडे, प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, सुरेश सुरत्ने, माया खोडके मॅडम, कांचन सिरसाट , व प्रशांत काळे यांनी परीश्रम घेतले. विज्ञान व गणितीय प्रदर्शनात झालेले वर्ग ५ वी मधून प्रथम अम्मारखान समीरखान, द्वितीय प्रविण मडावी, कृष्णा शेळके, प्रोत्साहनपर मो. अजैन मो इकबाल यांची निवड झाली. वर्ग ६ वी मधून प्रथम अंजली शर्मा, द्वितीय जान्हवी सहस्त्रबुद्धे, प्रोत्साहनपर आस्था शाहू, वर्ग ७ वी मधून प्रथम गौरी देशमुख, द्वितीय नम्रता मालगे, प्रोत्साहनपर निशाद पटेल यांचा समावेश आहे.

वर्ग ८ वी मधुन प्रथम सागर निकामे, द्वितीय रोशन धारपवार, प्रोत्साहन शुभंकर ढोरे, समर्थ अहीर, वर्ग ९ वी मधुन प्रथम तन्वी साळुंके, व्दितीय प्रेरणा मलिये, प्रोत्साहनपर ईशीका मनोज शुक्ला यांनी बाजी मारली. गणितीय रांगोळी स्पर्धेत ५ वी मधून प्रथम रिध्दी लामणे, द्वितीय साक्षी बामणकर, ७ वी मधून प्रथम किर्ती मडावी, व्दितीय नम्रता मालगे, वर्ग ६ वी मधुन प्रथम आस्था शाहू, द्वितीय कृतीका मांडेकर, वर्ग ८ वी मधून प्रथम विशाखा कुरील, द्वितीय प्रेरणा इंगोले, प्रोत्साहनपर शुभंकर ढोरे व समर्थ अहिर, वर्ग ९वी मधून प्रथम अश्विनी शेवाने, द्वितीय समीक्षा लाहुडकर प्रोत्साहनपर ईशिका शुक्ला यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...