आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्ती व्यवस्थापन विभाग24 तास दक्ष:महापालिकेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित, 45 कर्मचाऱ्यांची तीन सत्रात नियुक्ती

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात होणारी पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने 24 तास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. यासाठी तीन पाळ्यांमध्ये 45 कर्मचारी नियुक्त केले असून अग्निशमन विभागात हा कक्ष कार्यरत राहणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसात अचानकपणे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करुन आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे तसेच त्यांना त्वरित सर्वतोपरी मदत करण्याच्या हेतुने हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख म्हणून अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख एम. हारुण मनियार यांची तर सहाय्यक म्हणून लिडिंग फायरमन मनीष कथले तसेच राजेंद्र टापरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षात 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दैनंदिन कामकाज सांभाळून या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे लागणार आहे. पहिली पाळी सकाळी 8 ते दुपारी दोन वाजेपर्यंत असून यात 14 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या दुसऱ्या पाळीत 16 कर्मचारी तर रात्री 8 ते सकाळी 8 या तिसऱ्या पाळीत 15 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन मधील झोनल अधिकाऱ्यांना त्यांच्या झोनमध्ये आपत्ती उदभवल्यास त्यांच्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांकडून काम करुन घ्यावे लागणार आहे. तसेच विद्युत विभागाचे उप-अभियंता अमोल डोईफोडे, संतोष गावंडे यांच्याकडे आपत्ती काळात विद्युत व्यवस्थे संबंधितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उदभवल्यास नागरिकांनी एम. हारुण मनियार 8857889575, मनीष कथले- 9511885766, राजेंद्र टापरे- 9850141029 या भ्रमणदुरध्वनीवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...