आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश:आधार क्रमांक मोबाईलला लिंक आवश्यक; विद्यार्थी, पालकांना घ्यावी लागणार दक्षता

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ यासाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून आधार क्रमांक मोबाईला लिंक असणे आवश्यक आहे. प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यार्थी व पालकांनाच घ्यावी लाणार आहे. ऑनलाईन प्रवेशाकरीता विद्यार्थी व पालकांनी आधार क्रमांक लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पालकांना मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी माहिती भरलेले फार्म आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा लागणार आहे. अर्ज अपलोड करताना मोबाईलवरील ओटीपीव्दारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी आधार क्रमांक मोबाईल लिंक करणे आवश्यक राहिल. प्रवेश अर्ज प्रक्रियेकरीता http://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration या संकेतस्थळावर अपलोड करावा.

३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. मात्र त्यापूर्वी आधार क्रमांक मोबाईला लिंक करुन घ्यावे लागणार आहे. तांत्रिक व इतर कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यार्थी व पालकांनी घ्यावी राहू नये याकरीता मुदतीपुर्वीचे नोंदणी करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय (बाभूळगांव जहॉ.,अकोला) येथे किंवा 0724-2991087 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

हे आहेत निकष

  • प्रवेशाकरीता पात्रता जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकलेला असावा.
  • विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा.
  • विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीचे पूर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे.
  • विद्यार्थ्यांचा जन्म १ मे २०११ ते ३० एप्रिल २०१३ (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.
बातम्या आणखी आहेत...