आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील पिढीबाबत कृतज्ञता व्यक्त केल्यास देशाचा ऱ्हास:जयंत पाटील यांची भाजप आमदारांच्या उपस्थितीत फटकेबाजी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पिढीचा अनादर करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या काळात वाढली असून, यापूर्वीच्या पिढीने काहीच केले नाही, हे सांगण्याची प्रथाच देशात सुरू झाली आहे. देश उभा केलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यास देशाचा, त्या पिढीचा ऱ्हास होण्यास सुरूवात होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आमदारांच्या उपस्थितीतच फटकेबाजी केली. ते रविवारी सहकार नेते तथा माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांच्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पार पडलेल्या अमृत महोत्सव सोहळ्यात बोलत होते.

स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत योगदान दिलेल्या नेत्यांबाबत जयंत पाटील यांनी गौराोउदगार काढले. स्वातंत्र्यानंतर तेव्हाच्या नेत्यांनी केलेल्या परिश्रमामुळे आज देश उभा आहे. सध्या जात-धर्माच्या नावावर मते मागण्याचे प्रकार सुरू असल्याचेही पाटील म्हणाले.

एकत्र भोजनाचा आस्वाद

साेहळ्याला माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे, अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते डॉ. संतोष कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा निरीक्षक प्रविण कुंटे, डॉ.आशा मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी, भाजप नेत्यांनी एकत्र भोजनाचा आस्वादही घेतला.

देश एकसंघ करण्याचे कार्य

भारतात यापूर्वीच्या पिढीने, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील नेत्यांनी आपल्या कर्तबगारीने देश उभा केला. कधी काळी टाचणीही तयार न होणाऱ्या देशात आयआयटी, आयआयएमसारख्या अनेक संस्था उभा केल्या. पंडीत नेहरुंनी उभ्या केलेल्या आयआयटीसारख्या संस्थांमधून तयार झालेले विद्यार्थी आज जगातील सर्वोत्तम कंपन्यांचे नेतृत्व करीत असून, ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

इस्त्रोसारखी संस्था होमी भाभा यांना समोर करीत पंडीत नेहरुंनी उभी केली. ते देशाच्या पायाभरीणीत सक्रियपणे कार्यरत हाेते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात देशातील संस्थाने विलीन झाली; त्यांच्यामुळे देश एकसंघ झाला, असेही जयंत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...