आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूह राष्ट्रगीत:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; आज समूह राष्ट्रगीत गायन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन केले आहे. सहभागी हाेऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने परिपत्रक जारी करून सूचना दिल्या आहेत. राष्ट्रगीत गायनासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय तसेच इतर शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक, सर्व कार्यालये, यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी, सहकारी संस्था, सर्व खासगी आस्थापना, दुकाने, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल. राष्ट्रगीत गायनाच्या वेळी राष्ट्रगीताचा उचित सन्मान राखण्याबाबत दक्षता घ्यावी. या उपक्रमात सर्व खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व न‍िमशासकीय कार्यालयांमधील सर्व संबंधितांनी अधिकारी व कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...