आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाची सांगड:शिक्षणासोबतच खेळाची सांगड घालणे काळाची गरज : यादव

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना आज चांगल्या व संस्कारी शिक्षणाची खूप गरज असून त्यासोबतच खेळाची सुद्धा आवश्यकता आहे. ज्यामधून तो आपला सर्वांगीण विकास साधू शकेल, तेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबतच खेळाचाही अंगीकार करावा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक तथा बार्शीटाकळी तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद येथे क्रीडा दिन निमित्त आयोजित झालेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य तथा विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गजेंद्र काळे, ज्येष्ठ शिक्षक पल्हाडे उपस्थित होते.

विद्यालयात दोन दिवस पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर या वैयक्तिक तसेच व्हॉलीबॉल व कबड्डी या सांघिक खेळांचा समावेश होता. या सर्व स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र तथा रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत असतो. या वर्षी कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक यादव यांचा सन्मानचिन्ह देऊन प्राचार्य बिरकड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य गजेंद्र काळे, बिरकड यांनी मेजर ध्यानचंद यांचे देशाच्या हॉकी खेळातील इतिहास मांडला. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय मैद यांनी केले, तर आभार रत्नाकर उमाळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक दीपक गोल्डे, राजेश आमले, आत्माराम राठोड, अमोल शेळके, पुष्पा गोल्डे, रेखा डामरे, केशव पिंपलकर, मधुकर गोंडचवर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...