आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण व्यवस्थेवर इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चा सत्रात शिक्षण व्यवस्थेमधील आमुलाग्र बदल यावर मंथन करण्यात आले. कार्यशाळेत अमरावती विभागातील इंग्रजी शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला. प्रमुख वक्ते म्हणून माजी शिक्षणाधिकारी वामनराव बोलके यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण व महाराष्ट्रातील अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले. बदलत्या स्वरुपात शाळांनी बदल स्वीकरणे अपरिहार्य असल्याचेही ते म्हणाले. कायदेविषयक प्रमुख अॅड. प्रवीण बारंगे यांनी कायदेविषयक समस्या व उपाय योजनांवर उदाहरणांसह मार्गदर्शन केले. सर्व शाळांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाला विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष दिलीप कडू, दिनकर कडू, डॉ. प्रकाश गोखे, प्रदीप थोरात, यांच्यासह पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट या तालुक्यातील इंग्रजी शाळांचे संस्थाचालक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश्वर कॉन्व्हेंटचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सशक्तीकरण आवश्यक कार्यशाळेत प्रास्ताविक इंडिपेंडन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मेहरे यांनी केले. सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी संघटित होणे, त्यांचे सशक्तिकरण करणे आवश्यक असल्याचे मेहरे म्हणाले. दिलीप बांगर यांनी विचार मांडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.