आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला शहरातील चार ते पाच नराधमांनी 14 व 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालकांना दिले.
अकोला शहरातील या अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या संबंधितांना सूचना द्यावे. या मुलींना सामाजिक संस्था अथवा पोलिसांच्या सहाय्याने समुपदेशन करण्यात यावे. त्यांना मानसिक आधार देण्यात योग्य ती भूमिका घ्यावी. सदर मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. या आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी, या दोन्ही प्रकरणांचा तपास जलद गतीने व्हावा. या मुलीच्या पालकांशी बोलून त्यांना आवश्यक असेल तर सक्षम वकील देण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालकांना दिले.
16 डिसेंबरला घटना
16 डिसेंबरला रात्री दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना त्याने गाडीवर बसून दोघींनाही सिव्हिल पोलिस स्टेशन हद्दीतील असलेल्या पवन वाटिकेत नेले त्याने चॉकलेट आणि शीतपेय प्यायला दिले. ते पिल्यानंतर त्यांना गुंगी आली. त्या युवकाने दोघींनाही घेऊन काटेरी झुडपात घेवून गेला. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला.
मित्राकडूनही अत्याचार
संशयित आरोपीचा एक मित्रही घटनास्थळी आला त्यानेही त्या दोघींवर अत्याचार केले. या प्रकरणी तीन संशयितांना रविवारी अटक करण्यात आली. तिन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.