आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभाचे आयोजन:नवीन पाणी पुरवठा योजनेचे कातखेड ग्रामपंचायत येथे उत्साहात उद्घाटन

बार्शीटाकळी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक ग्रामपंचायत कातखेड ता. बार्शीटाकळी येथे १५ व्या वित्त आयोगामधून नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्व झाल्यामुळे उद्धघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभा भोजने तसेच वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्षा प्रभा सिरसाठ, वंचित बहुजन युवक आघाडी ता. अध्यक्ष अमोल जामनिक, पं. समिती सदस्य दादाराव पवार यांची उपस्थिती नागरिकांना लाभली.

कार्यक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. प्रभा शिरसाठ यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. विविध योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमानंतर दलित वस्तीमधील पाण्याच्या मोटरचे जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी रील कापून आणि दलित वस्ती मधील पाण्याच्या मोटरचे बटन दाबून पाणी सुरळीत सुरू करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन गवई केले आणि अमोल जामनिक वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांनी मत मांडले. आभार प्रदर्शन नितेश रमेशराव खंडारे ग्रामपंचायत सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडी चे तालुका कोषाध्यक्ष यांनी केले.

या वेळी दीक्षा खंडारे, उषा जाधव, भानू राठोड, वर्षा राठोड, अमोलीका खंडारे, उषा अवचार, मनोरमा इंगळे, प्रमिला खंडारे, लिला गवई, अनिता जाधव, कामिना खंडारे, रोहिणी अवचार उपस्थित हाेत्या. चंद्रवीर तेलगोटे, भास्कर वानखडे प्रधूम राठोड, ग्रामपंचायत सदस्य जानराव खरात, गजानन जाधव, मनोहर राठोड, ग्रामपंचायत सदस्य भूषण खंडारे, मिर्झापूर, अजय वानखडे, विशाल खंडारे, आकाश जाधव, दिगंबर चक्रनारायण, विनोद खंडारे, अक्षय वानखडे, अंकुश खरात, प्रदीप वानखडे, अभय खंडारे, श्रीकांत गवई, शुभम खंडारे, नागसेन चक्रनारायण, राजकिरण अवचार, रवी खंडारे, शामराव राठोड, समाधान चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश जाधव, अभय खंडारे, उमेश चव्हाण, ऋषिकेश खंडारे, रवी आठवले, दीपक राठोड, विक्की खंडारे, वैभव खंडारे, आकाश आठवले, बापूराव राठोड, उमेश गवई, भीमदास गवई, सुशील अवचार, नंदू राठोड उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...