आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीपीसीआर अहवाल:जिल्ह्यात दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह, पाच डिस्चार्ज

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळपर्यंत कोविड चाचण्यांचे १५८ आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये सहा महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. बाधितांमध्ये मूर्तिजापूर येथील एक, अकोला ग्रामीण येथील दोन व सहा जण अकोला महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. दिवसभरात पाच रुग्णांना डिस्चार्ज दिला. दरम्यान आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४९ झाली. यातील १० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर ३९ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ६५२६७ झाली.

बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक जिल्ह्यात ८ जूनपासून सलग कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आतापर्यंत एकूण ८६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये २१ ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या ही ५९ हून अधिक आहे. गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी युवकांचा वावर अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्यामध्ये युवकांचे प्रमाणही अधिक आहे. तर ६१ वर्षापुढील ९ रुग्णांना कोरोना झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.