आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीची औपचारिकता:ना बोगस बियाण्यांवर चर्चा; ना फसवणुकीवर ठोस उपाय

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी बियाण्यांचे २१ नमुने फेल आढळल्यानंतरही मंगळवारी झालेल्या खरीप हंगाम नियोजन बैठकीत बोगस बियाण्यांवर, प्रसंगी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर प्रत्यक्षात ठोसपणे चर्चाच झाली नाही आणि वेगळ्या उपाय योजनांचे नियोजन झाले नाही.

गतवर्षी बियाणे, खतांचा तुटवटा नरि्माण झाला नाही, असा दावा कृषी विभागाने बैठकीत केला तरी अनुपालनावर मात्र आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यंदा ४ लाख ८३,५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियाेजन केले असून, गतवर्षीच्या तुलनेने यंदा २४,१५७ हेक्टर जादा क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी अॅक्शन प्लान तयार करणार असून, हा आराखडा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व शेती तज्ज्ञ तयार करणार आहेत. बियाण्यांबाबत ‘वेलकम शेतकरी गो कंपनी’, ही संकल्पना राबवणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरीच तयार केल्याने जिल्हा सोयाबीन बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे अन्य शेतकऱ्यांपर्यंत स्वत:दरात पोहोचावे, या उद्देशाने ६ जूनला अर्थात शवरिाज्याभिषेक दनिी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित करण्याची घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली.

नियोजन भवनमध्ये २०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाबाबत बैठक घेतली. या वेळी आमदार नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, आ. प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जि. प. चे सीइओ सौरभ कटियार, उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना, डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. किशोर बिडवे, नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसेंसह उपस्थित होते.

मुद्दा: महाबजिच्या तक्रारी किती होत्या, तक्रारींचे नरिाकरण झाले काय, असा प्रश्न कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांनी केला होता.
प्रत्यक्षात काय झाले:- जिल्ह्यात प्राप्त ३ ३६१ पैकी ४० तक्रारीच वैध ठरल्या होत्या. यापैकी ५ शेतकऱ्यांना ८.८ क्विंटल मात्र िबयाणे दिले असून, उर्वरित ३५ शेतकऱ्यांना ४८.९० क्विंटल मात्रेसाठी ३ लाख ६६,४०० रकमेचे बियाणे किंमतीपोटी देण्यात आले, असे कृषी विभागाने सांगितले.

शेतकऱ्यांना पर्याय कोणता? : रासायनिक शेतीकडून सेंद्रिय वा जैविक शेतीकडे वळण्यास उद्युक्त करण्यासाठी पर्याय देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री कडू म्हणाले. हंगामासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घ्यावा. कृषी विभागामार्फत पेरणीबाबत शिफारसी ध्यानात घेऊन त्या वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

‘शेताच्या बांधावर प्रयोगशाळा’
जिल्ह्यात जैविक , सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, जमनिीची उत्पादकता वाढावी, विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शेताच्या बांधावर प्रयोगशाळा’ हा उपक्रम राबवण्याची सूचना पालकमंत्री कडू यांनी केली. याअनुषंगाने पुणे येथील फार्म लॅबतर्फे मार्फत डॉ. चव्हाण यांनी सादरीकरण केले.

असे आहे यंदाचे नियोजन : पेरणी क्षेत्र: यंदा ४ लाख ८३,५०० हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन केले. यात सोयाबीन २ लाख ३० हजार हेक्टर, कापूस १ लाख ६० हजार , तूर ५५ हजार हेक्टर, मूग २३ हजार तर उडीद १६ हजार हेक्टर क्षेत्रावर नियाेजन आहे. बियाणे : नियोजित क्षेत्रावरील पेरणीसाठी १ लाख ७४ १४५ क्विंटल बियाणे मागणी केली. महाबीज व एनएससीकडून २३,७७३ क्विंटल तर खासगी कंपनीकडून ३९ हजार १२१ क्विंटल नियोजन आहे. खत:- रासायनिक खत ८६,३१० मेट्रिक टन मंजूर आहे. एप्रिलमध्ये ३,६३५ मे टन तर मे महनि्यात ९०० मे टन साठा प्राप्त आहे. उपलब्ध साठा २५,७९३ मे टन आहे. युरिया १,३५० मे टन संरक्षित साठा मंजूर असून, १,२५० मे टन साध्य आहे.

कोणत्या बाबीसाठी दिला वेळ बैठकीची वेळ दुपारी ३ ची असताना पालकमंत्री ३.५६ वाजता आले. खरीपचे नियोजन, आढावा ४.२० वाजता संपला. याच वेळेत आमदारांनी शेतरस्त्यांवरही चर्चा केली. दुपारी ४.२० ते ४.४५ या दरम्यान ‘शेताच्या बांधावर प्रयोगशाळा’ याचे सादरीकरण, यावर प्रस्तावावर चर्चा झाली. ४.४५ वाजतापासून आमदरांनी सेंद्रिय शेती, गतवर्षीच्या बैठकीच्या इतविृत्ताबाबत असमाधान व्यक्त करणे, कृषी विभागातील रिक्त जागांचा मुद्दावर पालकमंत्र्यांनी उत्तर दिले. ५.१० वाजता बैठक संपल्याचे सांगितले.

मुद्दा : बियाणे खताचा तुटवडा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले होते.
प्रत्यक्षात काय झाले : गतवर्षी ४ लाख ५९,३४३ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीसाठी कंपन्यांकडून ८७,५३० क्विंटल बियाणे, शेतकऱ्यांचे ८७०४९ क्विंटल घरगुती बियाणे वापरले होते. एकूण १ लाख ४,५५० मेट्रीक टन खत उपलब्ध होते. त्यापैकी २९,४५८ मेट्रीक टन साठा शिल्लक राहिला. त्यामुळे गतवर्षी हंगामात बियाणे- खताचा तुटवडा जाणावला नाही, असे कृषी विभागेच म्हणणे आहे. मात्र महाबजिच्या अनुदानानित बियाण्यांसाठी कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांना अनुदानित बियाणेही मिळाले नव्हते.

मुद्दा : कपाशीवर बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाय याेजना करणार, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता.
प्रत्यक्षात काय झाले : बोंड अळी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाची अॅडवायझरी कृषी सहाय्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात आली. समाजमाध्यांवर शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांना माहिती देण्यात आली आणि गावनिहाय कृषी सहाय्यकांच्या भेटीचा कार्यक्रम राबविण्यात आला, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

मुद्दा : पीक वमिा योजनेबाबत नियोजन कसे करणार, असा प्रश्न पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला होता.
प्रत्यक्षात काय झाले : प्रधानमंत्री पीक वमिा योजनेबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. २ लाख ७९,९५२ शेतकऱ्यांनी वमिा काढला. यात शेतकऱ्यांनी १६ . ९४ कोटी, राज्य सरकारने व केंद्र सरकारने प्रत्येकी ५८.७१ कोटी भरले. एकूण १३४.३७ कोटी रुपये प्रमियिम भरला आिण शेतरक्यांना माेबदला म्हणून १४९. ६१ कोटी रुपये मिळाले.

शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे घरीच तयार केले. त्यामुळे त्यांना बियाणे कंपन्यांवर अवलंबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी तयार केलेलेे बियाणे अन्य शेतकऱ्यांना रास्त दरात मिळावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्याचा आदेश पाकलमंत्री कडू यांनी दिला.

काय ठरले होते अन् काय झाले ?
गेल्या वर्षीच्या खरीप नियोजन आढावा बैठकीत आमदारांनी उपस्थित केलेले काही प्रमुख मुद्दे. त्यावर कारवाईच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. मात्र, त्यावर पुढे काय झाले, याचा हा लेखाजोखा...

बातम्या आणखी आहेत...