आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची मदतीसाठी ५५ काेटी ४४ लाख रुपये मंजूर झाले असले तरी निधी तालुक्यांना आिण संबंधित शेतकऱ्यांना वितरीत हाेताना िदसून येत नाही. सप्टेंबर महिन्यात २३ हजार ८५१.७ हेक्टर तर ऑक्टोबरमध्ये १० हजार ४१३.९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते.
गत आठवठ्यात शासनाकडून निधी मंजूर झाला हाेता. यंदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टाेबर महिन्यात परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. यंदा पावसाळ्यात नदी-नाले भरून वाहत असून, सिंचन प्रकल्पातून तर अनेकदा पाण्याचा िवसर्ग करण्यात आला. पावसामुळे कापूस, साेयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली. वातावरण बदलाचा फटका शेतीला बसत असून, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. सप्टेंबर व ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. िजल्हा प्रशसानाने िवभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे िनधी मागणी करण्यात आली. त्यानुसार मदत मंजूर झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.